Madhuri Dhundiraj Mate
लंकेचा राजा, मारुतीचं शेपूट पेटवणारा, सीतेला पळवणारा रावण ओळखतो आपण.पण तो कधीतरी लहान असणारच ना! कसा असेल तो रावणबाळ ? लपालपी खेळताना पटकन् सापडणारा. टी-शर्ट पायातून अंगात घालणारा. तीनशे वीस दातांची दातदुखी आणि चाळीस अक्कलदाढांची हुषारी मिरवणारा ?