Madhuri Dhundiraj Mate
आपल्या आसपास बिल्डिंगमध्ये, कॉलनीत, चौकात मुलांची एक सोनेरी टोळी असतेच. अगदी क्षुल्लक कारणांवरून त्यांचे बिनसते आणि तितक्याच क्षुल्लक कारणांनी त्यांना खदाखदा हसू येते. उत्साहाने सळसळणाऱ्या वृत्तीची ही मुले एका जागी शांत बसत नाहीत. त्यांचे काही न् काही उद्योग सुरूच असतात.त्यांच्या मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप असतो. ज्यात मैत्री हा एकच निकष. त्यांच्यात घडणाऱ्या साऱ्याच घटनांना असतो एक लोभस रंग. ही कादंबरी त्याच रंगातली.मुले वाचन करत नाहीत अशी ओरड असताना, मुलांनी आवडीने वाचावीत अशी पुस्तके आज आहेत काय? या प्रश्नालाही उत्तर हवे. त्या दृष्टीनेच ही कादंबरी महत्त्वाची ठरेल.