Rakesh Kumar
भारतीय जनसंघाचे एक थोर नेते, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे एक सक्रिय सदस्य, ’राष्ट्रधर्म’ आणि ’पांचजन्य’ यासारख्या साप्ताहिकांचे मार्गदर्शक, तसेच शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये आपल्या अनुकरणीय योगदानामुळे प्रसिद्ध असलेले, भारत रत्न पुरस्काराने सन्मानित श्री नानाजी देशमुख यांच्यावर लिहिण्याची अमूल्य संधी मिळाली आहे. एक अशी थोर व्यक्ती, ज्यांनी लोकसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. मृत्यूनंतरही आपले पार्थिव वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी दान करण्याचे मृत्यूपत्र आपल्या मृत्यूच्या खूप आधी ११९९७ मध्ये करणारे, ही सर्व त्यांच्या थोर व्यक्तिमत्त्वाच्या विशालतेची उदाहरणे आहेत.